By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 10:35 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
घाटकोपरमध्ये साईबाबा गार्डन येथे नितेश सावंत या शिवसैनिकाची त्याच्या वाढदिवसाच्या निमिताने बोलावून मित्रांनीच धारदार शस्त्रांचे वार करून हत्या केल्याचे उघडकीस आले . या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून अन्य हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की, नितेश सावंत याचा त्याच्या मित्रांशी एक आठवड्यापूर्वी काही कारणांवरून वाद झाला होता या मित्रांनीच त्याचा सूड घ्यायचे ठरविले . त्याप्रमाणे शनिवारी नितेशचा वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याला रात्री उशिरा साईबाबा गार्डन येथे बोलावले. तो येताच त्याच्यावर शस्त्राने सपासप वार करून सर्वजण पळून गेले. ही माहिती पंतनगर पोलिसांना कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काल गंभीर जखमी नितेशला राजावडी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुले म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं पण काही नराधाम या मुलांचे अपहरण क....
अधिक वाचा