By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 05:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
सातारा - पसरणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून ३३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. वाईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने पसरणी घाटात वाईहुन महाबळेश्वरला जाणाऱ्या शिवशाही बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी वाईमधील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
यावेळी पुण्याच्या बस मध्ये ४५ तर शिवशाही बस मध्ये २५ प्रवासी प्रवास करत होते. समोरून शिवशाही बस आली नसती तर लक्झरी बस संरक्षक कठडा तोडून खोल दरीत कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. या अपघातामुळे वाई महाबळेश्वर रस्ता दुपारी चार पर्यंत बंद होता. वाई व पाचगणी बाजूला पसरणी घाटात वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, MH-06-BW-3575 क्रमांकाची शिवशाही बस वाईकडून महाबळेश्वरकडे पाचगणी घाटातून जात होती. तर समोरून भरधाव वेगात येणारी MH-11-L-5999 ट्रॅव्हल्सने जोराची धडक दिली. यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स रस्त्यातच पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बसचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात डॉन अरुण....
अधिक वाचा