ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत २१ हजार ४९ बनावट खाती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 04:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत २१ हजार ४९ बनावट खाती

शहर : मुंबई

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतल्या भ्रष्टाचाराचे एकेक नवनवे प्रकार दररोज उघडकीस येतायत. बँकेमध्ये २१ हजार ४९ खाती बनावट असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीये. या बँकांचे केवायसी करण्यात आलेलं नाही. केवळ एक्सेल शिटमध्ये या खात्यांची माहिती ठेवण्यात आली आहे. २०१७ पासून हा प्रकार सुरू असून बँकेतल्या केवळ जणांनाच याची माहिती होती, असं आता उघड झालं आहे. ऑडिटर, ऑडिट कमिटी एवढंच नव्हे, तर बँकेच्या संचालक मंडळापासूनही ही बाब दडपण्यात आली होती हे विशेष.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयाबाहेर रास्तारोको केला. आरोपींना जामीन देऊ नये अशी मागणी यावेळी कऱण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली. एचडीआयलचे सारंग वाधवान, राकेश वाधवान आणि बँकेचे माजी संचालक वरीयमसिंग यांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. दरम्यान, वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.

 

मागे

पीएमसी बॅंक खातेधारकांचे किला कोर्टसमोर आंदोलन
पीएमसी बॅंक खातेधारकांचे किला कोर्टसमोर आंदोलन

पीएमसी बॅंक खातेधारकांनी मुंबईत किल्ला कोर्टच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी ....

अधिक वाचा

पुढे  

740 कोटींचा घोटाळा, Ranbaxy च्या माजी प्रमोटरला अटक
740 कोटींचा घोटाळा, Ranbaxy च्या माजी प्रमोटरला अटक

औषध निर्माण क्षेत्रातली नामांकित कंपनी असलेल्या Ranbaxy चे माजी प्रमोटर शिविंद....

Read more