By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 04:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : jaipur
राजस्थानमध्ये तर पोलिसाच्या पत्नीलाच लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने डुंगरपूर जिल्ह्यातील एका पोलिस हवालदाराच्या पत्नीलाच पोलिसांच्या वसाहतीतून उचलून नेत खेरवाडामध्ये बलात्कार केला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ऋषभदेव ठाण्यात सुरेश कन्हैयालाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 मे रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये म्हटल्यानुसार पीडित महिला दोन वर्षांपूर्वी खेरवाडामध्ये शिकविण्यास जात असे. आरोपीदेखिल तेथे येत होता. या दरम्यान त्यांच्यामध्ये ओळख निर्माण झाली. तो तिच्याशी फोनवर बोलू लागला. याच दरम्यान आरोपीने तिचा अश्लिल फोटो काढला होता. या फोटोवरून तो तिला ब्लॅकमेल करत होता. धमकावून त्याने 40 हजार रुपये उकळले होते.
बारामतीमध्ये जन्मदात्या आईने मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्....
अधिक वाचा