ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धक्कादायक : सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; किडनी काढल्याचा नातेवाईकांचा आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 11:15 AM 2019-02-12T14:15:30+5:30

धक्कादायक : सायन रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल; किडनी काढल्याचा नातेवाईकांचा आरोप

शहर : मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी शवागारातील कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करीत नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

मुंबईतील सायन येथे असणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (वय २६) याला २८ ऑगस्ट २०२० रोजी उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका अपघातात जबर जखमी झाल्याने उपचारार्थ आलेल्या अंकुश सुरवडेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना जीवरक्षक प्रणालीसह उपचार पुरवण्यात येते होते.

दुर्दैवाने अंकुश याचे काल १३ सप्टेंबर २०२० सकाळी निधन झाले. विहित प्रक्रियेनुसार त्यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. दरम्यान, शीव रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवार, १२ सप्टेंबर २०२० ला मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होतेअंकुश आणि हेमंत या दोन्ही रुग्णांच्या शवांची उत्तरीय तपासणी काल रविवारी करण्यात आली. त्यानंतर दोन्ही शव रुग्णालयाच्या शवागारात राखण्यात आले होते.

अंकुश सुरवडे यांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळीच रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून कळवले की, दुपारी वाजेच्या सुमारास येऊन ते अंकुश यांचा शव ताब्यात घेतील. दरम्यानच्या कालावधीत, हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे ओळखून, सर्व प्रक्रिया पार पाडून, पोलीसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुशचा मृतदेह हा हेमंतचा मृतदेह असल्याचे समजून सोपवण्यात आले. हेमंतच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधीदेखील पार पाडले.

अंकुशचे नातेवाईक रुग्णालयात आले त्यांनी शव ताब्यात देण्याची विनंती केल्यानंतर ही चूक घडल्याचे लक्षात आले. या प्रकारामुळे अंकुश यांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. पोलीस प्रशासनही रुग्णालयात आले. घडल्या चुकीमुळे एकंदर परिस्थिती हाताबाहेर जावू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. सदर, मृतदेह अदलाबदल होण्याचा प्रकार हा दुर्दैवी असून त्याचे कोणत्याही प्रकारे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करत नाही, असं म्हणत पालिका प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.

शिवाय, शवागारातील संबंधित दोन कर्मचाऱयांना तत्काळ निलंबित करण्यात आले. तसेच या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल याबाबतची हमी देण्यात आली.

मागे

'टोसिलीझुमॅब'चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस
'टोसिलीझुमॅब'चा काळाबाजार! 40 हजार रुपयांच्या इंजेक्शनची 70 हजारांत विक्री केल्याचे उघडकीस

 राज्यात तुटवडा असलेल्या करोना उपचारावरील 'टोसिलीझुमॅब' इंजेक्शनचा पा....

अधिक वाचा

पुढे  

मानखुर्द येथील कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मानखुर्द येथील कोविड सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोविड सेंटरमध्ये एका तरुणाने अ....

Read more