ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Sri Lanka bomb blasts : कर्नाटकातील 7 पर्यटक श्रीलंकेत बेपत्ता, 2 जणांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 12:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Sri Lanka bomb blasts : कर्नाटकातील 7 पर्यटक श्रीलंकेत बेपत्ता, 2 जणांचा मृत्यू

शहर : देश

श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आणखी दोन बॉम्बस्फोट करण्यात आले. सातव्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठव्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याआधी दिली होती. तसेच, कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटानंतर जेडीएसचे सात कार्यकर्ते बेपत्ता असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असल्याचं ट्वीट केलं आहे.

'कोलंबोतील स्फोटांनंतर जेडीएसचे 7 कार्यकर्ते बेपत्ता असल्याचे माझ्या कानावर आले आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच स्पष्ट केल्याने मला धक्काच बसला आहे. हे दोघेही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही त्यांच्या सोबत आहोत' असे ट्वीट कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केले आहे.

कर्नाटकातील जेडीएसचे सात कार्यकर्ते हे प्रचार अभियानानंतर सुट्टीसाठी 20 एप्रिल रोजी श्रीलंकेला गेले होते. कोलंबोतील शँग्रिला हॉटेलमध्ये त्यांनी राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र रविवारी (21 एप्रिल) कोलंबोमध्ये तब्बल आठ साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर कर्नाटकतील 7 जण बेपत्ता झाले  आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या माहितीनुसार, श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात दोन कन्नड नागरिकांचा मृत्यू झाला असून के. जी. हनुमनथरयाप्पा आणि एम. रंगप्पा अशी या दोघांची नावे आहेत, हे दोघेही जेडीएसचे सदस्य आहेत.

श्रीलंकेमध्ये ईस्टर संडेला ख्रिश्चन बांधवांना लक्ष्य करीत घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा अमेरिका, ब्रिटन, रशिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश तसेच युरोपातील अन्य देशांनीही तीव्र शब्दांत निषेध केला आहे. श्रीलंकेतील बॉम्बस्फोट ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटले आहे. या बॉम्बस्फोटांचा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आड्रेन तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना तसेच बहारिन, कतार, संयुक्त अरब अमिरातीनेही तीव्र निषेध केला आहे. जर्मनीच्या चॅन्सलर एंजल मर्केल यांनी म्हटले आहे की, दहशतवाद समुळ नायनाट करायला हवा. श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांनी ही बाब पुन्हा अधोरेखित केली आहे. यासह अनेक देशांच्या प्रमुखांनी हल्ल्याचा निषेध केला.

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.

ईस्टर संडे असल्याने चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू झाला 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे. तसेच कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून असल्याची माहिती देणारे ट्वीट भारतीय दूतावासाने देखील केले आहे. या ट्वीटमध्ये भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. कोलंबो आणि बट्टीकालोआमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. मदत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा साठी क्रमांकही देण्यात आले आहेत. +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789 हे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत तर श्रीलंकेतील संपर्क क्रमांकाव्यतिरिक्त+94777902082 +94772234176 या  क्रमांकावरही भारतीय संपर्क करू शकतात.

 

मागे

ऑनलाईन पेमेंट द्वारे अर्बन बॅंकेला  68 लाखांचा गंडा
ऑनलाईन पेमेंट द्वारे अर्बन बॅंकेला 68 लाखांचा गंडा

कोल्हापुरातील अर्बन बँकेला ऑनलाईन पेमेंट द्वारे 68 लाखाचा गंडा घालण्यात आल....

अधिक वाचा

पुढे  

Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी
Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी

रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वा....

Read more