ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१५ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करून सावत्र बाप फरार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 04:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

१५ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करून सावत्र बाप फरार

शहर : पुणे

        पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये नराधम सावत्र बापाने आपल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस  आली. या प्रकरणी मुलीच्या आईने भोसरी पोलिसांत आरोपी सावत्र बापावर बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

       दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप रिक्षाचालक असून त्याने आपल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन हत्या केली. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे पीडित मयत अल्पवयीन मुलगी, लहान बहीण, आई आणि सावत्र बाप गेल्या दोन महिन्यांपासून एकत्र राहत होते. सावत्र बाप दोन्ही मुलींवर प्रेम करत असल्याचा संशय होता. तसेच पत्नीसोबतही वाद होत असत. त्यामुळे घरात सतत भांडणे सुरू असायची. 

      सायंकाळी मुलगी आणि सावत्र बाप दोघेच घरात असताना त्यांच्यात वाद झाला आणि यातूनच मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले, त्यानंतर मुलीचे तोंड दाबून आणि हाताने गळा दाबून हत्या केली व त्यानंतर आरोपी फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. मुलीची मोठी बहीण घरी आली तेव्हा ही खळबळजनक घटना समोर आली असून  फरार आरोपी बापाचा शोध घेण्यासाठी भोसरी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. 

मागे

मानवजातीची हद्द पार करणाऱ्या नराधमाला अटक; मातेलाच केली वासनेची शिकार
मानवजातीची हद्द पार करणाऱ्या नराधमाला अटक; मातेलाच केली वासनेची शिकार

             औरंगाबाद - संपूर्ण मानवजातीला लाज वाटेल अशी अत्यंत वाईट घ....

अधिक वाचा

पुढे  

शेतीकाम येत नाही म्हणून पतीकडून विवाहितेची हत्या
शेतीकाम येत नाही म्हणून पतीकडून विवाहितेची हत्या

         नाशिक – नाशिक जिल्ह्यात हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्....

Read more