ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गोवंडीत 7 वीच्या विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 03:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गोवंडीत 7 वीच्या विद्यार्थ्याने केली शिक्षिकेची हत्या

शहर : मुंबई

गोवंडीतील शिवाजी नगर येथील फ्लॅट नबर 26 मध्ये राहणार्‍या आयशा अस्लम हूसैया या शिक्षिकेची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करणार्‍या 7वी तील अल्पवयीन विद्यार्थ्याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याच्या पोलिसांचा अंदाज आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आयशा विवाहित असून तिला 7 वर्षाचा मुलगा आहे. मात्र तिचा पती मुलासह तिच्यापासून वेगळा राहतो. आयशा घराशेजारीच असलेल्या सूफी इंग्रजी शाळेत शिकवायची . शाळेनंतर ती घरातच शिकवणी घेत असे. सूफी शाळेतील विद्यार्थी व परिसरातील अनेक विद्यार्थी आयशाच्या घरी शिकवणीसाठी येत असत. सोमवारी रात्री 8 वाजता शिकवणी सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी निघून गेले. काही वेळाने 7 वीत शिकणारा हा विद्यार्थी पुन्हा तेथे आला. त्याने बाथरूममध्ये तोंड धुणार्‍या आयशाच्या पाठीत चाकूने वार केला. काही कळायच्या आत त्याने आयशाच्या पोटात आणि पाठीत 6 वेळा भोसकले. तेव्हा बचावासाठी बाहेर पळण्याचा प्रयत्न करताना आयशा दारातच कोसळली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. आयशा  रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तो विद्यार्थी मात्र घरातच बसून होता. शेजार्‍यांनी आयशाला आधी राजावाडी आणि नंतर सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मागे

10 हजार 500 गुंडांवर कारवाई
10 हजार 500 गुंडांवर कारवाई

विधानसभा निवडणुका काळात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी म....

अधिक वाचा

पुढे  

बेहिशेबी संपती बाळगणार्‍या बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यासह चौघांवर गुन्हा दाखल
बेहिशेबी संपती बाळगणार्‍या बांधकाम विभागाच्या कर्मचार्‍यासह चौघांवर गुन्हा दाखल

कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी संपती बाळगणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागात....

Read more