ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अभिजित देशमुखला गुन्हे शाखेया पथकाने ठोकल्या बेड्या

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 04:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अभिजित देशमुखला गुन्हे शाखेया पथकाने ठोकल्या बेड्या

शहर : पुणे

गुन्हे शाखेच्या पथकाने कोट्यवधी रुपये बुडवणार्‍या शेतकरी साखर कारखान्याचा अभिजित देशमुख याला अटक केले. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. अभिजित देशमुख हा महाराष्ट्र शेतकरी शुगर लि.कारखान्याचा चेअरमन असून त्याच्या विरोधात उस उत्पादक शेतकर्‍यांचे 2 कोटी 5 लाख 25 हजार 985 रुपये दिले नसल्याबाबत 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला होता.
परभणी जिल्ह्यातील सायखेडा येथील शेतकरी शुगर लिमिटेड कारखान्याचे चेअरमन अभिजीत देशमुख याने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेड न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला होता. तेव्हापासून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर होते. अखेर रविवारी रात्री त्याला पुण्यातून अटक केली असून, लवकरच नांदेड येथे आणले जात आहे. आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक नरवाडे यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी सायंकाळीपर्यंत त्याला नांदेड न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
साखर मौल्यासीस तयार करुन त्याच्या विक्रीतून 5 कोटी 65 लाख 20 हजार रुपये कमाविणार्‍या महाराष्ट्र शेतकरी शुगर लि.कारखान्याच्या चेअरमनने शेतकर्‍यांचे उसाचे 2 कोटी 5 लाख 25 हजार 985 रुपये दिले नाही. सन 2014 मध्ये मुदखेड तालुक्यातील अनेक गावांमधून महाराष्ट्र शेतकरी शुगर लि.उत्तमनगर,सायखेडा, सोनपेठ जि.परभणी येथील साखर कारखान्याने हजारो टन उस खरेदी केला होता. न्याहाळी गावातील गोविंद संभाजी गोपनपल्ले यांनी पहिल्यांदा 70 टन उस दिला होता. त्यांच्या नंतर 67 शेतकर्‍यांनी 3 हजार टन उस दिला होता. मात्र कारखान्याचे चेअरमन अभिजीत उत्तमराव देशमुख यांनी शेतकर्‍यांचे पैसे थकले होते. तेव्हा गोविंद संभाजी गोपनपल्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन 8 जुलै 2016 रोजी मुदखेड पोलीस ठाण्यात चेअरमन अभिजीत देशमुख व इतरांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

मागे

उल्हारनगरमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने महापालिकेतील निवडणूक कर्मचार्‍याचा मृत्यू
उल्हारनगरमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने महापालिकेतील निवडणूक कर्मचार्‍याचा मृत्यू

निवडणूकीच्या कामे करताना महापालिकाचे कर्मचारी भगवान मगरे यांचा दुपारी मृ....

अधिक वाचा

पुढे  

मोहम्मद शमीच्या पत्नीने केला राडा
मोहम्मद शमीच्या पत्नीने केला राडा

विश्वचषकासाठी निवड झालेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आयुष्या....

Read more