ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्रालयात चौथ्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न; तरुणी थोडक्यात बचावली

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्रालयात चौथ्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न; तरुणी थोडक्यात बचावली

शहर : मुंबई

           मुंबई - मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज दुपारी मंत्रालयात हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे मंत्रालयात सगळीकडे खळबळ उडाली. 

         प्रियंका गुप्ता असं या तरुणीचं नाव असून काही कामानिमित्त ही तरुणी मंत्रालयात आली होती. मात्र अचानक या तरुणीने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने खळबळ उडाली. चौथ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ही तरुणी पहिल्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर पडल्याने तिचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर तरुणीला रुग्णालयात दाखल केले.

           ही तरुणी संरक्षक जाळीवर विव्हळत असताना मंत्रालयाचे कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत होते. काही लोक फोटो काढत होते, तर काहीजण व्हिडिओ शुटींग करत होते. पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच तरुणीला संरक्षक जाळीतून बाहेर काढले. दरम्यान, तरुणीच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. ही तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. परंतु, ती नेमक्या कोणत्या कारणानं अस्वस्थ होती तसेच मंत्रालयात ती कोणत्या कामासाठी आली होती याची चौकशी पोलीस करत आहेत. 
 

मागे

शेतीकाम येत नाही म्हणून पतीकडून विवाहितेची हत्या
शेतीकाम येत नाही म्हणून पतीकडून विवाहितेची हत्या

         नाशिक – नाशिक जिल्ह्यात हत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्....

अधिक वाचा

पुढे  

‘दिशा विधेयक’ मंजूर झाल्याने बलात्काऱ्यांना  21 दिवसात फाशी
‘दिशा विधेयक’ मंजूर झाल्याने बलात्काऱ्यांना 21 दिवसात फाशी

आंध्रप्रदेश - विधानसभेत बलात्काऱ्यांना 21 दिवसात फाशीची तरतूद असणारं ‘द....

Read more