By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 02:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
म्हातार्या, आधी पैसे दे, मग लग्न कर असं म्हटल्याने झालेल्या वादातून हा खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. गणेश कोलटकर (58) असं हत्या झालेल्या व्यक्तिचं नाव असून पिंटू शर्मा (40) असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गणेश कोलटकर यांनी 2018 च्या सप्टेंबर महिन्यात स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी पिंटू शर्मा याने एक लाख रुपये गुंतवले होते. पण, दुर्दैवाने त्यांचा व्यवसाय तोट्यात गेला आणि पिंटू शर्माचे एक लाख रुपये अडकले. कोलटकर यांनी त्या रकमेतील 40 हजार रुपये त्याला परत दिले. मात्र, उर्वरित रकमेवरून त्यांचे वरचेवर वाद होऊ लागले. 16 जानेवारी 2019 रोजी हे दोघंही पिंटू याच्या भाड्याच्या घरात भेटले. तेव्हा बाकी असलेल्या पैशांवरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला. यावेळी गणेश कोलटकर यांच्या विवाहावरून पिंटूने त्यांना धमकी दिली. म्हातार्या, आधी माझे 60 हजार रुपये दे, मग लग्न कर असं म्हणत त्याने लग्नाची खिल्लीही उडवली. या वक्तव्यावरून त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं आणि त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीत पिंटूने कोलटकर यांच्या डोक्यावर प्रहार केला आणि ते जागीच गतप्राण झाले.
यानंतर पिंटू याने धारदार शस्त्रांनी कोलटकर यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. मांसाचे तुकडे टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केले तर हाडे आणि कवटी भाईंदरच्या खाडीत फेकून दिली. पोलिसांनी शर्मा याला पुराव्यांच्या आधारे अटक केली असून त्याच्याविरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. दुसरीकडे, कोलटकर यांच्या खुनाच्या उलगड्यानंतर शर्मा याच्यावर एलआयसी अधिकारी असलेल्या अरविंद रानडे यांच्याही अपहरण आणि हत्येचा संशय आहे. कारण, कोलटकर यांच्याप्रमाणेच रानडे हे सुद्धा शर्मा याच्या घरी गेले होते आणि तिथून परतले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे.
सीएसएमटी येथे 14 मार्च रोजी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्य....
अधिक वाचा