By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 06:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
तेलंगणातील 12 वी परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसात 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तेलंगणा बोर्डने घेतलेल्या 12 वीच्या परीक्षेत 10 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 3 लाख विद्यार्थी नापास झाले होते. यानंतर निकालामध्ये गडबड झाल्याचे वृत्त आले होते. विद्यार्थ्यार्थी आत्महत्या करत असल्याच्या वृत्तानंतर 26 एप्रिल रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक भरण्याचे काम हैदराबादमधील खासगी कंपनी ग्लोबलरेना टेक्नोलॉजीला का दिले गेले असा सवाल आयोगाने विचारला आहे. याआधी हे काम सरकारी कंपन्यांना दिले जात होते. आयोगाने राज्याचे मुख्य सचिव एस.के.जोशी यांना चार आठवड्यात याचे उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी संबंधित आरोपींवर काय कारवाई केली व पीडित कुटुंबांना कशा प्रकारे मदत केली याचे उत्तर देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे ग्लोबलरेना टेक्नोलॉजी कामगिरी चांगली नसताना आणि त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी असून सुद्धा हे काम त्यांना देण्यात आले होते. 12वी परीक्षेत नापास झालेल्यांपैकी एक गज्जा नाव्याला तेलगु विषयात 0 गुण देण्यात आले होते. नाव्याने तिचा पेपर पुन्हा तपासणीसाठी दिला. री-इव्हाल्यूएशनमध्ये नाव्याला ज्या पेपरमध्ये 0 गुण मिळाले होते तेथे 99 गुण झाले. नाव्या बाबत जे झाले त्यामुळे अन्य मुलांच्या सोबत असाच प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 12वीचा निकाल लावताना गडबड झाल्यामुळे अनेक जण नापास झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
निवडणूकीच्या काळात शहरामध्ये कुठेही दारू किंवा अन्य माध्यमातून नागरिकांन....
अधिक वाचा