ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई नको

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 06, 2019 11:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई नको

शहर : देश

हैदराबाद डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणीच्या चारही आरोपींचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हे एनकाऊंटर झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यानंतर तेलंगणा पोलिसांकडून या वृत्ताला दुजोराही देण्यात आला. याच घटनेनंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आरोपींवर तेलंगणा पोलीसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचं निर्भयाच्या आईकडून समर्थन करण्यात आलं आहे. एनकाऊंटरवर एकिकडून काही प्रश्न उपस्थित केले जात असतानाच निर्भयाच्या आईने मात्र पोलिसांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाऊ नये कारण, त्यांनी जे केलं ते योग्यच होतं अशी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

'आजही मी न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहे, आता मला न्याय द्या अशी आर्जव करत हैदराबादमधील घटनेनंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांना माझ्यासारखा संघर्ष करावा लागू नये असंच मला वाटत होतं. ज्यावर आता कारवाई झाली आहे. मुख्य म्हणजे आता निर्भया आणि इतरही बलात्कार पीडितांना फाशीचटी शिक्षा दिलीच गेली पाहिजे', असं त्या म्हणाल्या.

हैदराबाद पोलीस आणि प्रशासनाचे आभार मानत आपल्यालाही न्याय मिळेल यासाठीचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी निर्भयाला न्याय मिळण्यास होणारी दिरंगाई आणि बलात्काराचं कृत्य याविषयी बोलताना तिच्या आईच्या आवाजातून संताप आणि वेदना व्यक्त होत होत्या. पोलिसांशीच गैरव्यवहार करण्याचं धाडस करणाऱ्या हैदराबाद बलात्कारातील आरोपींवर करण्यात आलेली ही कारवाई पाहता आता किमान पोलिसांशी गैरव्यवहार करण्यास हे नराधन धजावणार नाहीत अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या सात वर्षांपासून निर्भया बलात्कार प्रकरणी तिच्या कुटुंबीयाना वारंवार न्यायालयीन फेरा घालावा लागत आहे. पण, आता मात्र याप्रकरणीच्या दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी आर्जव त्यांनी प्रशासनाकडे केली.

आजच्या क्षणापर्यंत आपण वारंवार प्रशासनाकडे आरोपींच्या शिक्षेची मागणी केली. पण, त्यांच्या मानवाधिकारांचा मुद्दाच पुढे केला गेला. गेल्या सात वर्षांपासून आम्ही संघर्ष करत आहोत. दर दिवशी आम्ही मरणयातना सहन करत आहोत. तेव्हा आतातरी निर्भयावर अत्याचार करणाऱ्या आणि हे अमानवी कृत्य करणाऱ्यांना फाशी द्या, हाच सूर निर्भयाच्या आईने आळवला.

मागे

हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर
हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर

हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चारही आरोपींचं एन्काऊंटर करण्यात आलं आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

हैदराबाद एन्काऊंटर :लोकांना समाधान वाटतं म्हणून समाधान व्यक्त केलं, तर…उज्ज्वल निकम
हैदराबाद एन्काऊंटर :लोकांना समाधान वाटतं म्हणून समाधान व्यक्त केलं, तर…उज्ज्वल निकम

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी केलेला एन्काउं....

Read more