ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहशतवादी अन्सारी फरार

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 04:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहशतवादी अन्सारी फरार

शहर : मुंबई

      अजमेर जेलमधून पॅरोलवर सुटून आलेला कुख्यात गुंड डॉ. जलीस अन्सारी फरार झाल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे. १९९० च्या दशकापासून  ५० हून जास्त बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये दहशतवादी अन्सारीचा समावेश होता. 

        १९९२ च्या दशकात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये त्याच्यावर ६ बॉम्बस्फोटाचे आरोप आहेत. अजमेरमधून त्याला पॅरोल मिळाल्यानंतर दहशतवादी अन्सारी हा काही दिवसांसाठी मुंबईत आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आला होता मात्र  शुक्रवारी पहाटे तो फरार झाला. गुप्त यंत्रणेकडून याची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी तातडीने दखल घेत महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्रांचला त्वरित याची माहिती दिल्याने त्याच्याकडून जलीस अन्सारीची  शोधण्याची  मोहीम सुरू आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारीचा पॅरोल शुक्रवारी संपणार होता, त्याला अजमेर जेलमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु तो असे  न करता गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास बेपत्ता झाल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोपी जलीस अन्सारी हा मुजाहिद्दीन, सिमी आणि इतर दहशतवादी संघटनाशी  संबंधित आहे. तो दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग द्यायचा. म्हणून त्याला डॉ.बॉम्ब नावाने ओळखले जाऊ लागले. तसेच तो मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपी आहे.

      दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि दहशतवाद्यांशी घनिष्ट संबंध असल्याने न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.      

मागे

विक्रमच्या जामिनावर २१ जानेवारीला होणार सुनावणी
विक्रमच्या जामिनावर २१ जानेवारीला होणार सुनावणी

          डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी विक्रम भावे या....

अधिक वाचा

पुढे  

४ शिक्षकांनी केला ११ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
४ शिक्षकांनी केला ११ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

         नांदेड - भारतासह संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घ....

Read more