ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी,बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 15, 2019 05:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी,बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता

शहर : देश

अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या काही भागांमद्ये सतक्रतेचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवादी संघटना भारतात विविध ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरुपाचे दहशतवादी हल्ले घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेपाळवाटे तीन दहशतवादी भारतातील जम्मू काश्मीर येथे असणाऱ्या बांदिपोरा या भागात दाखल झाले आहेत. साजिद मीर असं नाव असणाऱ्या एका दहशतवाद्याने तीन परदेशी दहशतवद्यांना शेजारी राष्ट्र नेपाळमधील काठमांडूवाटे बांदिपोरामध्ये घुसखोरी करत दाखल केलं. जेथे दहशतवाद्यांचे काही छुपे तळ असल्याचंही म्ह़टलं जातं. जैश--मोहम्मद आणि लष्कर--तोयबा या संघटनांच्या हालचाली येथे मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. नेपाळमधून झालेल्या या घुसखोरीमुळे सध्या जम्मू- काश्मीर परिसरात सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंता आणि तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

एकिकडे नेपाळमधून झालेली दहशतवाद्यांची घुसखोरी अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत असतानाच दुसरीकडे बांग्लादेसमधूनही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. तेथील जमात-उल-मुजाहिद्दीन (जेएमबी) या दहशतवादी संघटनेकडून महिला आत्मघातकी हल्लोखोराला तयार करण्यात आलं आहे. भारत, म्यानमार आणि बांग्लादेश येतील बुद्ध मंदिरांमध्ये या हल्लेखोरांकडून हल्ले घडवून आणण्याचा कट असल्याची माहिती मिळत आहे.

 

मागे

चोरट्यांचा राष्ट्रीय खेळाडूवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
चोरट्यांचा राष्ट्रीय खेळाडूवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

राष्ट्रीय रोईंगपटू निखिल सोनवणे याच्यावर चोरट्यांनी लूटमार करण्यासाठी प्....

अधिक वाचा

पुढे  

फेसबुकवर मोदी, प्रज्ञासिंहविरोधात पोस्ट टाकणार्‍या डॉक्टरला अटक
फेसबुकवर मोदी, प्रज्ञासिंहविरोधात पोस्ट टाकणार्‍या डॉक्टरला अटक

विक्रोळीत राहणार्‍या रविंद्र तिवारी यांनी शनिवारी विक्रोळी पार्कसाइट पो....

Read more