ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुलाने केले आईच्या मृतदेहाचे तीन भागात विभाजन

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुलाने केले आईच्या मृतदेहाचे तीन भागात विभाजन

शहर : मुंबई

         मुंबई - कुर्ला परिसरात जन्म दिलेल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. आईच्या मृतदेहाचे तीन तुकड्यात विभाजन केले. एसी चालू करून शरीर ३६ तास घरातच ठेवल्याची माहिती समोर आली आहे. 


          आरोपीचे नाव सोहेल शेख आहे. त्याने आईच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. ३० डिसेंबर रोजी विद्याविहार या भागातमध्ये शरीराचे तुकडे आढळून आले. तसेच या मृतदेहाबरोबर गुडघ्याच्या खालचा भाग मृतदेहासोबत नसल्याने या मृतदेहाला ओळखण्यास कठीण झाले होते.


        घाटकोपर पोलिसांच्या माहितीनुसार, आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलाने पुन्हा हातोड्याने वार करून घरात भरपूर प्रमाणात रक्त साचल्याने रक्त बाहेर जात होते, असे लक्षात आल्यावर आरोपीने मृतदेहाला बाथरूममध्ये आणले.

       आईच्या अंगावरती असलेले सर्व दाग दागिने विकून त्याला ५० हजार रुपये मिळाले. त्या पैशातून त्याने २५ हजार रुपये गहान असलेली दुचाकी सोडवली आणि उरलेले २५ हजार बारमध्ये काम करत असलेल्या प्रियसीला दिले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने दुचाकीचा वापर केला अशी त्याने पोलिसांना कबुली दिली. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

मागे

गौरी लंकेश हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक 
गौरी लंकेश हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक 

        रांची - ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणातील मास्टमाईंड ऋ....

अधिक वाचा

पुढे  

राज्यपालांना केला फेक कॉल: दोघा मित्रांना अटक
राज्यपालांना केला फेक कॉल: दोघा मित्रांना अटक

         भोपाळ : गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाने राज्यपालांना शिफारश....

Read more