ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृत्यू

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 01:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृत्यू

शहर : thiruvananthapuram

          तिरुअनंतपुरम - ‘जगीज् कूकबुक’ या कुकरी शोमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहत्या घरातील किचनमध्ये जगी मृतावस्थेत सापडली. मात्र तिच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही.


       जगी जॉन केरळमधील कुर्वणकोनममध्ये आईबरोबर राहत होती. जगीचा मृतदेह दुपारी चार वाजताच्या सुमारास तिच्या मित्रांनी पाहिला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. जगीच्या शरीरावर कोणतीही जखम आढळलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच जगीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.


          जगी जॉन 45 वर्षांची होती. तिचा जन्म सौदी अरेबियात झाला, तर इंग्लंड, यूएस आणि भारतात तिचं शिक्षण झालं. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर जगी प्रचंड लोकप्रिय होती. नाताळच्या निमित्ताने रविवारी केलेली पोस्ट तिची अखेरची पोस्ट ठरली.
 

मागे

शालेय सहलीच्या बसला अपघात
शालेय सहलीच्या बसला अपघात

       पुणे : संगमनेरच्या बी. जे. खताळ शाळेच्या बसला अपघात झाल्याची घटना घ....

अधिक वाचा

पुढे  

मेट्रोच्या क्रेनने उचललेली प्लेट अंगावर पडून कामगार ठार
मेट्रोच्या क्रेनने उचललेली प्लेट अंगावर पडून कामगार ठार

        पुणे - बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकाजवळ मेट्रोचे काम सुरू असत....

Read more