By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 28, 2020 11:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : कुख्यात गुंड अरुण गवळीला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयानेही जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताच अरुण गवळीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी न्या. आर भानुमती आणि न्या ए.एस.बोपण्णा यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस जारी करून उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, २ मार्च २००७ रोजी अरुण गवलीच्या दोघा हस्तकांनी जामसंडेकर यांची हत्या केली होती. या प्रकरणी सत्र न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्याविरोधात गवळीने उच्च न्यायालयात अपिल केले होते. हे अपिल उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ९ डिसेंबरला फेटाळून त्याची शिक्षा कायम ठेवली होती. त्याविरोधात आता गवळीने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे.
वसई : ठाण्याहून वसईत जाणार्या एका ट्रकने रस्त्यावर झोपलेल....
अधिक वाचा