ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाशिकमध्ये पोलीस अधीक्षकांच्या घरातच चोरी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 08, 2019 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाशिकमध्ये पोलीस अधीक्षकांच्या घरातच चोरी

शहर : नाशिक

नाशिक शहरात गेल्या दोन महिन्यापासून चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. पोलिसांना चोरांनी चांगलेच चकवीत कोट्यावधींची लूट केली आहे. आता मात्र थेट नाशिक शहरात मध्यवस्तीत असलेल्या ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातच चोरी झाली आहे. बंगल्यातून चंदनाची तीन झाडे तोडून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बंगल्यात दिवस रात्र सुरक्षा यंत्रणा तैनात असताना चोरट्यांनी दहा वर्षांची एक फूट व्यासाची झाडे अलगद चोरून नेल्याच्या प्रकार उघडकी आला आहे. या परिसरात सर्व पोलीस अधिकारी राहतात. या परिसराला पोलीस मुख्यालयाचा कडेकोट बंदोबस्तही आहे. असे असूनही पोलिसांना मात्र चोरट्यांच्या कृत्याचा आणि चोरट्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही. 

या घटनेने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. ही घटना पाच जूनला रात्री घडली. तीन दिवस उलटूनही या प्रकरणाचा कोणताही तपास लागलेला नाही. अखेर शहर पोलिसांच्या सरकारवाडा पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता शहरात नागरिकांसोबत पोलीस वसाहतही सुरक्षित नसल्याची भावना शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.

मागे

भांडुपमधल्या स्थानिक क्रिकेटरची हत्या
भांडुपमधल्या स्थानिक क्रिकेटरची हत्या

राकेश पवार हा एक स्थानिक क्रिकेटपटू होता. तो लहान मुलांना क्रिकेटचे प्रशिक....

अधिक वाचा

पुढे  

कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

जम्मू काश्मीरच्या कठुआमधील बंजारा समाजाच्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार....

Read more