By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 01:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : चंद्रपूर
चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेत्याने बलात्कार पीडित मुलींबाबत बेताल वक्तव्या प्रकरणी सामाजिक स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे. बेलगाम वक्तव्यामुळे आदिवासी समाज विशेष नाराज झाला असून आदिवासी समाजाच्या महिलांनी संघटीत होऊन या नेत्यांचा जाहीर निषेध केला आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी ‘पॉस्कोअंतर्गत सरकारकडून मिळणार्या पैशांसाठी आदिवासी मुली बलात्कार झाल्याची तक्रार देण्यासाठी पुढे येतात’ असे बेलगाम वक्तव्य केले आहे. त्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकारकडून पैसे मिळतात. असे असल्याने आदिवासी मुली अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, असे हीन दर्जाचे आणि संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी आदिवासी समाजाच्या बलात्कार पीडित मुलींबाबत केले होते. याबाबत भाजपने या काँग्रेस नेत्यांवर एट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
कोलंबोमध्ये सिवोय सिनेमाजवळ बुधवारी सकाळी आणखी एक स्फोट झालाय. मिळालेल्या ....
अधिक वाचा