By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
अखंड हिंदुस्तानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ख्याति असलेल्या भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराची दानपेटी दोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार विश्रामबाग पोलिस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे कायदा सल्लागार मिलिंद पवार यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने बुधवार पेठ येथील गणपती भवन व गणपती मंदिरात सीसीटीव्ही बसवलेले आहेत. शहाराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या व विश्रामबाग आणि फरासखाना या दोन मुख्य पोलिस ठाण्यांपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गणपती मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही दानपेटी स्टीलची असून ती दोन फुट आकाराची आहे. मंगळवारी पहाटे ३ वाजून ३१ मिनिटे झाली असताना दोन अज्ञात चोरटे मंदिरात दरवाजा तोडून आत आले आणि त्यांनी दानपेटी चोरल्याचे सीसीटीव्हीत दिसत होते. यावरुण पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
लांजा तालुक्यातील देवधे गावात एका माथेफिरूने ७ जणांवर प्राणघातक हल्ला केल....
अधिक वाचा