ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाथरीत ७ दुचाकीसह चोरट्याला अटक

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पाथरीत ७ दुचाकीसह चोरट्याला अटक

शहर : मुंबई

पाथरी शहरात चोरीच्या दुचाकी विक्री करीत असताना एका चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ११ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले आहे़ त्याच्याकडून चोरीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेतील कर्मचारी मंगळवारी फरार आरोपींचा शोध घेत असताना चोरी प्रकरणातील एक आरोपी पाथरी येथील बसस्थानक परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी बसस्थानक परिसरात छापा टाकला़ तेव्हा आरोपी गणेश काशीनाथ गायकवाड (रा़ बांदरवाडा, ता़ पाथरी) हा चोरीची मोटारसायकल विक्री करीत असताना मिळून आला़ही मोटारसायकल त्याने मंठा येथून चोरल्याची कबुली दिली अधिक चौकशी केली असता, गणेश गायकवाड याने मंठा, परतूर, मानवत, सेलू येथून काही मोटारसायकल चोरल्या असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे आरोपीला विश्वासात घेवून चौकशी केली असता, सेलू शहरातून चोरलेली मोटारसायकल जवळा झुटा येथील अंगद आश्रोबा झुटे यास विक्री केल्याचे समोर आले पोलिसांच्या पथकाने अंगद झुटे यासही सेलू कॉर्नर येथून ताब्यात घेतले आहे़ या आरोपीकडून पोलिसांनी एकूण ७ दुचाकी जप्त केल्या आहेत़.

सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या़ जप्त केलेल्या दुचाकींची किंमत १ लाख ३७ हजार रुपये एवढी आहे़ या प्रकरणी गणेश गायकवाड आणि अंगद जुटे यांना सेलू पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकाँ सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, पोलीस नाईक जमीर फारुखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे यांनी केली

मागे

पंढरपूरजवळ टेम्पो-ट्रॅक्टरचा धडकेत  , पाच वारकऱ्यांचा मृत्यू
पंढरपूरजवळ टेम्पो-ट्रॅक्टरचा धडकेत , पाच वारकऱ्यांचा मृत्यू

कर्नाटकातील बेळगावजवळील मंडोळी आणि हंगिर्गे गावातील अकरा वारकरी टेम्पोने....

अधिक वाचा

पुढे  

सोशल मिडीयावर आमदाराची बदनामी; तक्रारीनंतर अनेकजण लेफ्ट
सोशल मिडीयावर आमदाराची बदनामी; तक्रारीनंतर अनेकजण लेफ्ट

दोडामार्ग - तालुका गोव्यात विलिनीकरणाच्या मुद्‌द्‌याबाबत तयार केलेल्या....

Read more