ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कार्लातील एकविरा देवीचा कळस चोरणार्‍या चोरट्यांना अटक

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 04:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कार्लातील एकविरा देवीचा कळस चोरणार्‍या चोरट्यांना अटक

शहर : lonavla

3 ऑक्टोबर 2017 रोजी पहाटेच्या सुमारास ही कळस चोरी झाली होती. एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला गेल्यामुळे एकविरा देवस्थान ट्रस्ट मध्ये मोठा गदारोळ झाला होता. ग्रामस्थ व ट्रस्ट असा वाद विकोपाला गेल्याने कळसाचे राजकारण झाले होते तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध  देवस्थान असलेल्या सदरच्या मंदिराच्या कळसाची चोरी करणार्‍याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर उभे होते. मध्यंतरी हा तपास सिबीआयकडे देखील देण्यात आला होता. सध्या एलसीबीच्या पोलीस निरीक्षक पदावर असलेले पद्माकर घनवट यांनी पदभार स्विकारताच या घटनेचा छडा लावण्याचा चंग बांधला होता. त्याप्रकरणाचा तपास करत असताना नगर जिल्ह्यातील दोन जणांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी कळस चोरीची कबूली दिली. आज सकाळी एलसीबी पथकाने स्थानिक ग्रामस्त व पोलीस मित्र यांना सोबत घेत एकविरा देवीच्या डोंगरात शोध घेत चोरट्यांनी लपविलेला कळस हस्तगत केला. याप्रकरणाची माहिती देण्याकरिता पुणे ग्रामीण कार्यालयाच्या कृष्णा सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
चोरटे हे ठाकर समाजाचे  असून एक जण सेंटरिंगचे काम करतो तर दुसरा शेती काम करतो. ते दोघे आळंदी येथे आले असता त्यांनी यु ट्युब वर एकविरा देवीचे गाणे पाहिले होते. या गाण्यात देवीचा कळस सोन्याचा दिसत असल्याने त्यांनी कळस चोरीचा चंग बांधला. त्यानुसार 3 आँक्टोबर रोजी कळसाची चोरी केली. मंदिराचा पठारावर बसून त्यांनी कळस घासला असता तो सोन्याचा नसून धातूचा असल्याचे समजल्याने त्यांनी कळस चोरून न नेहता तेथेच डोंगराच्या एका नाल्यात लपवून ठेवला व पुन्हा गड उतरुन ते निघून गेले अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

मागे

धक्कदायक! पाच नराधमांनी केला पतीसमोरच पत्नीवर बलात्कार
धक्कदायक! पाच नराधमांनी केला पतीसमोरच पत्नीवर बलात्कार

राजस्थानमधील अलवर येथे पतीबरोबर सासरी जाणार्‍या महिलेवर पाच जणांनी सामूह....

अधिक वाचा

पुढे  

कर्जबाजारीपणाला कंटाळून अक्षय तृतीयेच्या दिवशीच शेतकर्‍याने केली आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून अक्षय तृतीयेच्या दिवशीच शेतकर्‍याने केली आत्महत्या

सोलापूरमध्ये दृष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत जात आहे. दुष्काळाच्या या द....

Read more