By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 05:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : virar
विरार - विरार पश्चिम भागातल्या विराटनगर परिसरातील ग्रीष्मा पॅलेस सोसायटीच्या ग्राऊंड फ्लोरवर चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी वृद्ध महिलेची हत्या करून पसार झाल्याचा प्रसंग घडला आहे. मनीषा डोंबल या वृद्ध महिलेच्या छातीत धारधार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली असून घरातील सर्व दाग-दागिने, ठेवलेली रोख-रक्कम घेवून पसार.
घरात मनीषा डोंबल एकट्याच असताना चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवून हत्या करण्यात आली. मनिषा डोंबल ह्या ६३ वर्षाच्या होत्या त्यांचे पती मनोहर डोंबल यांच्या बरोबर विरारला राहत होत्या. पती मनोहर डोंबल हे संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान घरी आले, तेव्हा मनिषा डोंबल मृतावस्थेत दिसताच त्यांनी त्वरित विरार पोलिसांना ह्या घटनेची माहिती दिली.
विरार पोलिसांना या प्रसंगाची माहिती मिळताच त्यांनी एक स्पेशल टीम तयार केली, मनीषा डोंबल हत्या प्रकरणी सोसायटीच्या आवारात असलेल्या सर्व सी.सी.टीव्ही फुटेज पोलिस अधिकारी तपास करत आहेत.
वर्धा - वर्ध्यातील नखाते कुटुंबासोबत नियतीने अजब खेळ खेळला. ....
अधिक वाचा