ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 12:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- पंतप्रधान नरेंद्र मोदी

शहर : kalpi

जवाहरलाल नेहरुंनी कुंभमेळ्याला दिलेल्या भेदीदरम्यान हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते कौशांबीत एका जाहीर सभेत बोलत म्हणाले. नेहरुंनी कुंभमेळ्याला भेट दिली. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो नागरिकांनी प्राण गमावला. मात्र सरकारची आणि नेहरुंची नाचक्की टाळण्यासाठी त्यावेळी हे वृत्त दाबण्यात आलं, असा दावा मोदींनी केला. 
यंदा कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक आले. पंतप्रधान स्वत: आले. मात्र कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही. कोणाचाही मृत्यू झाला नाही. सरकार बदलल्यावर व्यवस्था कशी बदलते, याचं हे उदाहरण असल्याचं मोदी म्हणाले. ’नेहरु कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी आले होते, त्यावेळी तर फारशी गर्दीदेखील नव्हती. केंद्र आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मात्र तरीही चेंगराचेंगरीचं वृत्त दाबण्यात आलं. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना एक रुपयादेखील दिला गेला नाही. केवळ चेंगराचेंगरीच नव्हे, तर त्यानंतरदेखील जे घडलं ते अतिशय असंवेदनशील होतं. अन्यायकारक होतं,’ असं मोदी म्हणाले.
मी अनेकदा कुंभमेळ्याला भेट दिली आहे, असं मोदींनी सांगितलं. ’जेव्हा सरकार बदलतं, तेव्हा नियत बदलते आणि त्यानंतर परिणाम दिसू लागतात. प्रयागराजनं यंदा हे अनुभवलं. आधी या ठिकाणी कुंभमेळा व्हायचा, तेव्हा आखाड्यावरुन वाद व्हायचे. भ्रष्टाचार झाल्याची चर्चा व्हायची. मात्र यंदाच्या कुंभमेळ्यानं सर्वांची मान अभिमानानं उंचावली. एकही आरोप झाला नाही. ज्यांनी या मेळ्यात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली, त्यांच्याबद्दल तर माझ्या मनात अतिशय आदराची भावना आहे. त्यांनी कुंभमेळ्याबद्दल लोकांच्या मनात असलेली प्रतिमा बदलली,’ असं मोदींनी म्हटलं. 

 

मागे

बिहारमध्ये बाराचट्टी भागात नक्षलवाद्यांचा उच्छाद; जेसीबी, ट्रॅक्टर पेटवले
बिहारमध्ये बाराचट्टी भागात नक्षलवाद्यांचा उच्छाद; जेसीबी, ट्रॅक्टर पेटवले

आता बिहारमध्ये नक्षलवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. गया जिल्ह्यातल्या बाराच....

अधिक वाचा

पुढे  

भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची सरकारविरोधात बॅनरबाजी
भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांची सरकारविरोधात बॅनरबाजी

नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर सरकार विर....

Read more