ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेळगावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या !

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बेळगावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या !

शहर : बेळगाव

      बैलहोंगल तालुका पंचायतीचे माजी सदस्य शिवानंद अंदान शेट्टी यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची अमानुषपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री २ ते पहाटे ४ च्या सुमारास तिघेही गाढ झोपेत असताना धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. 

       शिवानंद यांच्या मुलाचा विवाह सोहळा दहा दिवसात पार पडणार होता, त्याधीच जमिनीच्या वादातून त्यांच्याच नातेवाईकांनी हे हत्याकांड घडवले आहे. दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विवाह सोहळ्याच्या तयारीत असनार्‍या घरात तीन मृतदेह पडल्याचे पाहून त्यांच्या नातलगांचा आक्रोश अनावर झाला. रविवारी सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. शिवानंद शेट्टी (वय५५), तसेच त्यांची पत्नी शांतव्वा शेट्टी (वय ४६) आणि मुलगा विनोद शेट्टी (वय २६) अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

        शिवानंद यांच्या मुलाचा विवाह सोहळा ३० जानेवारीला धारवाड्याच्या तरुणीशी होणार होता. घरात विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती आणि लग्न पत्रिकाही वाटून झाल्या होत्या. जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, आणि अतिरिक्त पोलिस प्रमुख अमरनाथ रेड्डी, कितूर एसीपी आदी अधिकार्‍यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात भाऊबंदकीतील तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.    
    

मागे

४ शिक्षकांनी केला ११ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
४ शिक्षकांनी केला ११ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

         नांदेड - भारतासह संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घ....

अधिक वाचा

पुढे  

हिजबुळ मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी ठार!
हिजबुळ मुजाहिद्दीनचे तीन दहशतवादी ठार!

         जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात १५ जानेवा....

Read more