By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 06:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार 8 फेबु्रवारी रोजी दाखल होती़. या मुलीला पळवून नेताना त्याने काहीही मागमूस ठेवला नव्हता़. तब्बल तीन महिन्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाला एक छोटासा धागा मिळाला़. त्यावरुन पोलिसांनी लवासाच्या डोंगरापलीकडे डोंगरात लपून बसलेल्या या दोघांचा शोध घेऊन मुलीची सुटका केली़.
आरोपी हा 21 वर्षाचा असून तो मुलीच्या ओळखीचा आहे़. त्याने तिला आमिष दाखवून 8 फेब्रुवारीला पळवून नेले होते़. तो मोबाईलही वापरत नव्हता़. तसेच कोणत्याही नातेवाईकाशी त्याने संपर्क साधला नव्हता़. त्यामुळे काहीही कळायला मार्ग नव्हता़. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस नाईक किरण अब्दागिरे यांना एक छोटासा धागा मिळाला़. त्याचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर मुलगी व आरोपी हे मुळशी तालुक्यातील तव या गावी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली़.
सोलापूरमध्ये दृष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत जात आहे. दुष्काळाच्या या द....
अधिक वाचा