ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2020 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान, मुंबईत तीन स्टंटबाजांना बेड्या

शहर : मुंबई

भरधाव गाडीच्या खिडकीत लटकून मद्यपान करणाऱ्या स्टंटबाजांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाकोला वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर ओंगळवाणं प्रदर्शन करणाऱ्या तरुणांबाबत विलेपार्ले पोलिसांनी अटक केली.

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर वेगवान गाडीबाहेर लटकन दारु पिणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ नुकताच समोर आला होता. मागील खिडकीच्या काचा खाली करुन त्यावर बसत दोन युवक मद्यपान करत असल्याचं यामध्ये दिसत होतं. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करुन त्यांच्या अटकेची मागणी केली जात होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन डिसेंबरला मध्यरात्री जवळपास एक वाजून 25 मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सहारा उड्डाणपुलाजवळ MH 47 AB 6622 या कारमधून धावत्या गाडीच्या दरवाजाबाहेर लटकून मद्यपान करणाऱ्या युवकांचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला होता.

पोलिसांनी तक्रार दाखल करुन कार चालक अनिरुद्ध जगदाळे आणि त्याचे मित्र अरबाज सय्यद आणि दीपक सिकरिया यांना अटक केली. पोलिसांनी जगदाळेची कारही जप्त केली आहे. विलेपार्ले पोलिसांनी कलम 279, 336, 34 अंतर्गत कारवाई केली.

स्टंटबाजांची मुंबई

मुबई लोकल असो किंवा उत्तुंग इमारती, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्टंटबाजांची कमतरता नाही. कोणी आत्मानंदासाठी असे स्टंट करतं, तर कोणी फेसबुक, टिकटॉक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया अकाऊंटवर झळकण्यासाठी. लाईक्स आणि वाहवा मिळवण्याच्या नशेतून ही स्टंटबाजी फोफावली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कारवाई करु शकतात, मात्र या मानसिकतेवर इलाज सापडलेला नाही.

मुंबई लोकलमध्ये दरवाजात लटकून स्टंट करणारे कमी नाहीत. कधी लोकलमधील सहप्रवाशांनी त्यांना सुनावलं, तर कधी मार्गालगतच्या विजेच्या खांबांचा प्रसाद त्यांना खावा लागला. अनेकांना प्राणाला मुकावं लागल्यानंतरच ही स्टंटबाजी थांबली.

उंच इमारतीच्या धोकादायक भागावर स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. इमारतीच्या पॅराफीटवर दोन्ही हातांवर उभं राहून हा तरुण हँडस्टँड करत होता. व्हिडीओमध्ये आजूबाजूचा परिसर दिसल्याने ही गगनचुंबी इमारत असल्याचं समजलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेऊन कारवाई केली आहे.

मागे

NCB Officer Suspended|आरोपींना सहकार्य, तपासादरम्यान संशयास्पद भूमिका, एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित
NCB Officer Suspended|आरोपींना सहकार्य, तपासादरम्यान संशयास्पद भूमिका, एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या आरोपींना सहकार्य, तसेच तपासादरम्यान ....

अधिक वाचा

पुढे  

TRP scam | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक
TRP scam | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक

फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदान....

Read more