ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कांदिवलीत वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण;दोघांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 03:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कांदिवलीत वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण;दोघांना अटक

शहर : मुंबई

कांदिवली परिसरात वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांनाअटक केली आहे. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृत पार्क गाड्यांवर कारवाई करत असताना प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल सीताराम शिंदे यांना गाडी मालक असलेल्या शमशाद अहमद मोहम्मद हसन खान (२४) याच्यासह सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान (२८) याने मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही भावांना अटक करण्यात आली आहे.   

कांदिवली पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात भा. दं. वि. कलम 353, 332, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक विभागात काम करणारे प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल सीताराम शिंदे (५३) हे अनधिकृत पार्क गाड्यांवर क्लीपिंग कारवाई करत असताना आरोपी नामे शमशाद अहमद मोहम्मद हसन खान आणि सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान यांनी संगनमत करून फिर्यादीच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून हाताच्या ठोश्याने मारहाण करून जमिनीवर पाडले आणि लाथा - बुक्यांनी मारहाण करून जखमी केले. सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केलेल्या पोलिसाला आणि साक्षीदारांना धमकी दिली म्हणून गुन्हा नोंद दाखल करण्यात आला.

 

मागे

बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या - अन्न व औषध प्रशासन
बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या - अन्न व औषध प्रशासन

उन्हाळ्यात आंब्यांचा सिझन असल्यामुळे आंब्यापासून बनलेला आमरसावर सर्वच जण....

अधिक वाचा

पुढे  

महिलांच्या चेजींगरुममध्ये मोबाईल कॅमेरा, अश्लील शूटिंग करणारा कर्मचारी अटकेत
महिलांच्या चेजींगरुममध्ये मोबाईल कॅमेरा, अश्लील शूटिंग करणारा कर्मचारी अटकेत

अंधेरीतील एका कार्यालयातील महिलांच्या चेंजीग रुममध्ये मोबाईल कॅमेरा लावू....

Read more