By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 05:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
राज्याची उपराजधानी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या होमटाऊन असलेल्या नागपुरात एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाचे अपहरण करून निर्घृण प्रकारे हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर अमरावती मार्गावर कोंढालीजवळ एक अज्ञात मिळाला मृतदेह मिळाला होता. त्यानंतर तपास केल्यावर हा मृतदेह बॉबी ऊर्फ चॅटि माकन याचा असल्याचा उघड झाले आहे.
बॉबी हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते आणि जरीपटका पोलिस ठाण्यात ते हरविल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. मृत बॉबी यांची इनोव्हा गाड बेवारस अवस्थेत जरीपटका पोलिस स्टेशनच्या मागे सापडली होती. मृत बॉबी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असू्न काटोल येथील ग्रामीण रुग्णालय पोस्टामार्टमसाठी नेण्यात आला आहे. प्रॉपर्टीच्या वादातून बॅाबी यांचे अपहरण आणि हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. नागपूरच्या जरीपटका भागातील जगत सेलिब्रेशन हॉलजवळ बॉबी माकन राहत होते आणि त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता.
कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो जवळ एका सिनेगॉगमध्ये गोळीबार झाल्याची घटना शनि....
अधिक वाचा