By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 29, 2019 01:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नागपूर
नागपूरच्या वडधाम परिसरातील आंध्र कर्नाटक रोडलाईन्स या ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कार्यालायत विकी आगलावे या ट्रकचालकाला छताला टांगून ट्रकमालक अखिल पोहनकर आणि त्याचा साथीदार अमित ठाकरे मारहाण करीत असल्याचा विडिओ व्हायरल होताच मोठी खळबळ उडाली. या प्रकारानंतर पोलिसांनी पोहनकर आणि ठाकरेंविरिधात भारतीय दंड विधनाच्या कलाम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आंध्र-कर्नाटक ट्रान्सपोर्ट एजन्सीने विकिला (ट्रकमध्ये लोड केलेले साहित्य आणि वोल्व्हो बसचे काही पार्ट्स) थिरुवनतपुरमला पोहोचविण्याची जबाबदारी दिली होती. त्यासाठी टोल टॅक्स व इतर खर्चासाठी 35 हजार रुपये रोख आणि 12 हजार रुपयांचे डिझेलही भरून दिले होते. परंतु विकिने थिरुवनतपुरमला जाण्यापूर्वीच सर्व पैसे खर्च केलेच शिवाय डिझेलही परस्पर विकले. यानंतर विकी बरेच दिवस बेपत्ता होता. ट्रक मालक पोहनकार एका राजकीय संघटनेचा पदाधिकारी आहे. पोहनकर व त्याचा साथीदार अमित ठाकरे यांनी ट्रक चालक विकिला अखेर गाठले आणि एजन्सीच्या कार्यालयात आणले. तेथे त्याला छताच्या हुकाला दोरीने टांगून दोघांनी लोखंडी सळीने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या प्रकारचा विडिओ व्हायरल होताच मारहाण करणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी चिंचवड मधील भोसरी येथील फातिमा बागवान या महिलेने गरिबीला कंटाळून 3 म....
अधिक वाचा