By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 06:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
दोन १४ वर्षांच्या मुली ९ हत्या करण्याचा प्लॅन करु शकतात, यावर खरंतर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. अमेरिकेतील फ्लोरिडामधील ही घटना आहे. हे प्रकरण जास्त धक्कादायक यासाठी आहे कारण ९ जणांची हत्या करण्याचा प्लॅन त्यांच्याच क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षांच्या दोन मुलींनी केला होता. या दोन मुलींनी ८ पानांवर या हत्याकांडाचा संपूर्ण कट रचला होता आणि या प्रोजेक्टला नाव दिलं होतं ११/९.
डीलेनी बार्न्स आणि सोलांज ग्रीन या दोघींना गेल्या आठवड्यात फ्लोरिडाच्या एवॉन पार्कमधून अटक करण्यात आली. दोघींवरही हत्येचा कट रचण्याचा आरोप आहे. चौकशीतून पोलिसांच्या हाती ८ पानांचा एक असा पुरावा मिळाला, जो वाचून पोलिसही हैराण झालेत. 'प्रोजेक्ट ११/९' नावाच्या या फाइलमध्ये या १४ वर्षांच्या भोळ्या दिसणाऱ्या मुलींनी हत्येचा पूर्ण कट रचला होता. तोही एखाद्या प्रोफेशनल किलरसारखा.
तीन भागात हत्येचा कट
पोलिसांच्या रिपोर्टनुसार, 'प्रोजेक्ट ११/९'च्या ८ पानांवर एवॉन पार्क मीडिल स्कूलच्या त्या ९ मुला-मुलींच्या नावाचा उल्लेख होता, ज्यांची हत्या होणार होती. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता. या हत्येचा कट तीन भागांमध्ये विभागण्यात आला होता. त्यांना फसवणे, हत्या करणे आणि त्यांचा मृतदेहांना ठिकाण्यावर लावणे. हे कागदावर स्क्रीप्टप्रमाणे लिहिलं होतं.
हत्येवेळी काय परिधान करणार हेही ठरलेलं
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, डीलेनी आणि सोलांज यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये मृतदेह आणणे, दफन करणे, हत्या करताना दोघी काय परिधान करतील याचाही उल्लेख होता. खासकरुन हेही लिहिण्यात आलं होतं की, नखं आणि केसांचा थोडाही भाग कपड्याबाहेर असू नये. या हत्येच्या कटाचा खुलासा गेल्या बुधवारी या प्लॅनची फाइल मुलींकडून हरवल्यावर झाला होता. ही फाइल शाळेतील एका शिक्षकाला मिळाली होती.
पोलिसांची एन्ट्री
फाइल हरवल्यावर डीलेनी आणि सोलांज दोघींनाही धक्का बसला. त्यांना असं म्हणतानाही ऐकण्यात आलं की, जर कुणाला फाइल मिळाली तर हा एक प्रॅंक होता असं सांगायचं. शिक्षकाने फाइल मिळतात शाळेच्या प्रशासनाला माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं.
पोलिसांनी यावर सांगितले की, 'याने काहीही फरक पडत नाही की, मुली आता याला प्रॅंकचं नाव देतील किंवा गंमतीचं. अशाप्रकारचं वागणं अजिबात गंमत नाही. ८ पानांच्या या फाइलमध्ये हत्येचा संपूर्ण कट हाताने लिहिण्यात आला होता. हा ९ मुला-मुलींच्या जीवनाचा प्रश्न आहे. ही गंमत नाहीये'.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदींमध्ये झालेल्य....
अधिक वाचा