By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 07, 2020 03:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सांताक्रूझ पूर्व येथे एका महिलेवर झालेल्या बलात्कार आणि हत्ये प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री दोघांना अटक केली. विनोद विश्वनाथ घाडी(वय ३५)आणि सुनील सखाराम कदम (वय ३५)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सांताक्रूझ येथील वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (४ फेब्रुवारी)सायंकाळी हि घटना घटली. दोन्ही आरोपी महिलेच्या शेजारीच राहत होते.
Mumbai Police: Two people arrested for allegedly raping & murdering a woman in Santacruz area of the city. Case registered under relevant sections, further investigation underway. pic.twitter.com/uTJBXF5B4a
— ANI (@ANI) February 7, 2020
४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ते दोघेही मध्यधुंद अवस्थेत असताना त्यांनी त्या महिलेला त्यांच्या घरी बोलावले आणि तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महिलेने विरोध केला त्यामुळे त्यांनी तिला मारहाण केली व तिच्यावर बलात्कार केला नंतर तिला ठार मारले.भाड्याने घेतलेल्या खोलीत आरोपींसोबत राहणाऱ्या तिसऱ्या इसमाने त्या महिलेचा मृतदेह पाहून ताबडतोब वाकोला पोलिसांना कळविले.आरोपींवर कलम 302 (खून), 376 (बलात्कार) आणि 376 (डी) (सामूहिक बलात्कार)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(लैंगिक अत्याचाराशी संबंधित खटल्यांबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पीडितेची ओळख तिच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी उघड करण्यात आलेली नाही)
मिरारोड : काशी-मिरा परिसरात बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार....
अधिक वाचा