By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 05:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बीड
बीड : बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या बिंदुसरा नदीच्या पात्राजवळील शेतजमिनीच्या विहिरीत २ मृतदेहासह मोटारसायकल आढळून आल्याची खळबळजनक घडना उघडकीस आली आहे. या प्रकरणादरम्यान, आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आधी आरोपींना अटक करा असे सांगत त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.
पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरालगत असलेल्या कृष्णा मंदिराजवळ बिंदुसरा नदीच्या काठी मळ्यातील एका विहिरीत दोन मृतदेह तरंगतांना आढळले. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्रीच्या सुमारास हे मृतदेह काढण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले नाही.
मात्र, गुरुवारी पुन्हा प्रयत्न करत मृतदेह बाहेर काढण्यास आले. त्या दोन मृतदेहाची ओळख पटल्यावर हा घातपाताचा प्रकार असून त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. बीड शहरामधील शाहूनगर भागात राहणारा आकाश श्रीकृष्ण हरनाळे वय (२०) आणि हॉटेल अतिथीच्या मागे राहणारा कर्नर हिरासिंग शिकलकर (वय १९) अशी त्या मृतांची नावे आहेत. तसेच आढळलेल्या मृतदेहांना शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते दोन्ही मुले १४ जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे शहर पोलीसांनी माध्यमांना बोलताना सांगितले आहे. तरी या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
बंगळूर : अत्याचार, लैंगिक छळ, अपहरण, मानवी तस्करी आदी भयानक आरो....
अधिक वाचा