ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महापालिकेच्या घंटा गाडीखाली चिरडून दोन मित्रांचा मृत्यू

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 24, 2019 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महापालिकेच्या घंटा गाडीखाली चिरडून दोन मित्रांचा मृत्यू

शहर : मुंबई

             पालघर - नालासोपारा येथील तुळींज परिसरात महापालिकेच्या घंटा गाडीखाली दुचाकी आल्याने, दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात तुळींज पोलीस ठाण्यात महापालिकेच्या घंटागाडी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.


            नालासोपारा येथील रहिवासी नितीशकुमार द्विवेदी (२०) व त्याच्या मित्र अनिकेत हरकेश सिंह (२०) हे रात्रीच्या वेळी चहा घेण्यास बाहेर पडले होते. दरम्यान टाकीरोड ममता मेडिकल समोर सदराचा अपघात घडला. यावेळी महापालिकेची घंटा गाडी कचरा उचलण्यासाठी जात असताना अचानक गाडीच्या मागच्या चाकात या दोघांची दुचाकी सापडली.


          यात घंटा गाडीच्या चाकाखाली अनिकेत सापडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, नितीशकुमारच्या डोक्यालाही जबर मार लागला होता, उपचारा दरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर घंटा गाडी चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. मात्र काही नागरिकांनी गाडीचे फोटो पोलिसांना दिल्यामुळे पोलिसांनी गाडी ताब्यात घेत चालकाच्या नावाने गुन्हा दाखल केला. सध्या चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती तुळींज पोलिसांनी दिली आहे.
 

मागे

२३ मोरांना विषबाधा करणार्‍या शेतकर्‍याला अटक
२३ मोरांना विषबाधा करणार्‍या शेतकर्‍याला अटक

      राजस्थानमधील बीकानेर परिसरातील सेरुना गावात राहणार्या  शेतकर्य....

अधिक वाचा

पुढे  

शालेय सहलीच्या बसला अपघात
शालेय सहलीच्या बसला अपघात

       पुणे : संगमनेरच्या बी. जे. खताळ शाळेच्या बसला अपघात झाल्याची घटना घ....

Read more