ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

१६८ किलो कांद्याची चोरी केल्याने दोघे पोलिसांच्या ताब्यात...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

१६८ किलो कांद्याची चोरी केल्याने दोघे पोलिसांच्या ताब्यात...

शहर : मुंबई

मुंबई - सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा दरवाढीने पाणी आणले आहे. आता तर कांद्याचा दर १२० रुपयांचा घरात पोहोचल्याने व्यापाऱ्यांना चांगले पैसे मिळत आहे. कांद्याला चांगला भाव आल्याने चक्क त्याची चोरी होत असल्याची बाब पुढे आली आहे. २० हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या कांद्याची चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली. 

ही कांदा चोरी आठवडाभरापूर्वी झाली असून तब्बल १६८ किलो कांद्याची किंमत २१ हजार १६० रुपये आहे. ही चोरी ५ डिसेंबर ते ६ डिसेंबरच्या मध्यरात्री करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील दोन दुकानांतून कांदे चोरीला गेल्याचे सीसीटीव्ही चित्रित झाले आहे. तर दुसऱ्या दुकानातून ५६ किलो कांद्याची चोरी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोने, पैसे आणि किंमती ऐवज चोरी झाल्याच्या घटना घडतच असतात. थोडा थोडका नाही तर तब्बल १६८ किलो कांदा चोरी केली गेली. चोरीला गेलेल्या कांद्याची किंमत २१ हजार १६० रुपये एवढी होती. अकबर शेख आणि इरफान शेख नावाच्या व्यापाऱ्याचा कांदा चोरीला गेला होता. याप्रकरणी डोंगरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनीही वेगाने तपास चक्र हलवत अमरान शेख आणि साबीर शेख या दोघा चोरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
 

मागे

१९९० ते १ डिसेंबर २०१९ पर्यंत २२ हजार ५५७ दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा..!
१९९० ते १ डिसेंबर २०१९ पर्यंत २२ हजार ५५७ दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा..!

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवल्यानंतर सध्या काश्....

अधिक वाचा

पुढे  

फाशीसाठी बक्सर दोरखंडाचा केला जातो वापर, पण का?
फाशीसाठी बक्सर दोरखंडाचा केला जातो वापर, पण का?

'निर्भया'च्या दोषींना फाशी कधी होणार? हा प्रश्न देशातील अनेकांना पडलाय. आ....

Read more