ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आणखी दोघा नराधमांनी गतिमंद मुलीवर केला बलात्कार...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 06:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आणखी दोघा नराधमांनी गतिमंद मुलीवर केला बलात्कार...

शहर : बुलढाणा

बुलढाणा – खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरीमधील मानसिकरित्या कमजोर असलेल्या १६ वर्षीय बालिकेवर तेथीलच दोघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या हैदराबाद बलात्कार प्रकरणानं देश हादरला. ती घटना संपते ना संपते तर उन्नाव मध्ये दुसर्या

मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ह्या दोन्ही घटना ताज्या  असतानाच मंगळवारी रात्री गतिमंद मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याचे चित्र समोर आले. ही मुलगी मंगळवारी संध्याकाळी काही वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी गावातीलच एकाने तिने गाठले.  

आमीष देऊन निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या साथीदारानेही तिच्यावर निर्जनस्थळी आणि परिसरातील एका झोपडीत अत्याचार केला. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने घरातील मंडळींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. 

आरोपींनी पीडित बालिकेला आम्ही तुझ्यासोबत लग्न करतो असे आमिष ही दिल्याचे समजते. दरम्यान तिने सर्व हकीकत सांगितल्यावर घरातील मंडळींनी तिला सोबत घेत पोलीस स्टेशन गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून शोध मोहिम राबवून दोन आरोपींना अटक केली आणि दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ज्ञानेश्वर तायडे आणि दत्ता साठे अशी आरोपींची नावे आहे. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.
 

मागे

फाशीसाठी बक्सर दोरखंडाचा केला जातो वापर, पण का?
फाशीसाठी बक्सर दोरखंडाचा केला जातो वापर, पण का?

'निर्भया'च्या दोषींना फाशी कधी होणार? हा प्रश्न देशातील अनेकांना पडलाय. आ....

अधिक वाचा

पुढे  

हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करणं अत्यावश्यक - सुप्रीम कोर्ट
हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करणं अत्यावश्यक - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली-  तेलंगणा पोलिसांनी घेतलेल्या हैदराबाद चकमकीप्रकरणी सुप्रीम ....

Read more