ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नंदुरबारमध्ये पोलिसांवर हल्ला, 2 पोलिस जखमी 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नंदुरबारमध्ये पोलिसांवर हल्ला, 2 पोलिस जखमी 

शहर : नंदूरबार

नंदुरबारमध्ये नगाव येथे हाणामारीचे प्रकरण सोडविण्यात गेलेल्या पोलिसांवरच जमावाकडून दगडफेक  करण्यात आली आहे. यामध्ये हल्ल्यात दोन पोलिस कॉन्स्टेबल जखमी झाले असून पोलिस वाहनाचे नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील नगाव येथे 13 एप्रिल, 2019 रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भिल्ल आणि कोळी वसाहतीमधील दोन गटांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण सोडवण्यासाठी नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी वाहनाने त्या ठिकाणी गेले. तेथे ज्ञानेश्वर शिवराम भिल, तुकाराम शेमले, सरदार भिल, अंकुश चुनीलाल भिल यांच्यासह सहा जणांनी जमावासमवेत येऊन पोलिस वाहनावर हल्ला केला. वाहनावर तसेच पोलिसांवर दगडफेक केली. नंतर काठ्या घेऊन वाहनावर आणि पोलिसांवर हल्ला केला.

मागे

आंबेडकर जयंती साजरी करुन परतताना अपघात, एकच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
आंबेडकर जयंती साजरी करुन परतताना अपघात, एकच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

बुलडाण्यामध्ये मेहकर-डोनगाव रस्त्यावर भीषण अपघात आंबेडकर जयंती साजरी करू....

अधिक वाचा

पुढे  

धक्कादायक! लग्न करून प्रेमी युगुलाची आत्महत्या
धक्कादायक! लग्न करून प्रेमी युगुलाची आत्महत्या

वाशिममधील शुक्रवार पेठेत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ ....

Read more