ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार???

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 31, 2019 12:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार???

शहर : देश

नीरव मोदीला ३० मे रोजी चौथ्यांदा ब्रिटनच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी पुन्हा एकदा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. तसंच त्याच्या न्यायालयीन कोठडी २७ जूनपर्यंत वाढ करण्यात आलीय. २७ जून रोजीच पुढची सुनावणी होणार आहे. नीरव मोदी सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्डसवर्थ तुरुंगात कैद आहे.

लंडनच्या मेट्रो बँकेतून त्याला अटक करण्यात आली होती. फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या रिमांडबाबत पुढील सुनावणी २७ जून रोजी होणार आहे. ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात सुनावणीसाठी नीरव मोदीला हजर करण्यात आलं. यावेळी, नीरवला भारतात प्रत्यार्पित करण्यात आल्यास त्याला कोणत्या तुरुंगात ठेवलं जाणार? असा प्रश्न ब्रिटनच्या न्यायालयानं विचारलाय. तसंच याबाबत १४ दिवसांच्या आत माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने भारत सरकारला दिले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नीरव मोदीला वेस्टमिन्स्टर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बुथनॉट यांच्यापुढे नीरव मोदीची सुनावणी झाली.

मागे

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : कनिष्ठ डॉक्टरांनी पायल तडवीचे शवविच्छेदन केल्याचा आरोप
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : कनिष्ठ डॉक्टरांनी पायल तडवीचे शवविच्छेदन केल्याचा आरोप

मुंबईच्या नायर रूग्णालयातील डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी नवा खुलास....

अधिक वाचा

पुढे  

गो एअरच्या तरुण कर्मचाऱ्याची वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
गो एअरच्या तरुण कर्मचाऱ्याची वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

गो एअर या खाजगी विमान कंपनीत काम करणाऱ्या मंथन चव्हाण १९ वर्षीय तरुणाने आत्....

Read more