By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 15, 2019 12:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबईमध्ये धारावी परिसरात रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या धारावीतील पीएमजीपी कॉलनीतील इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत शाहदाद अली अन्सारी या 32 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणमुळे इमारतीचा भाग कोसळल्यामुळे ही माहिती समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा पाइप रिक्षाचालकावर कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर, दोघे जखमी झाले. शामलाल जोहरालाल जायस्वाल (60) व साजिद खान (33) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.
मोबाईलमधील सेल्फी आणि टिकटॉक या अॅपची भुरळ आजकालच्या तरुणाईमध्ये वाढत असू....
अधिक वाचा