By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2019 04:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
रायबरेली येथे झालेल्या अपघातात उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी आणि तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. तर पीडित तरुणीची काकी आणि मावशी यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेली पीडित तरुणीची प्रकृती खालावली असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मंगळवारी (6 ऑगस्ट) दुपारी एम्सने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पीडित तरुणीवर उपचार सुरू लखनऊ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर तरुणीला रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी लखनऊ येथून नवी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये हलवण्यात आले आहे. विमानतळावरून रुग्णालयात नेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. त्यामुळे 14 किमी अंतर 18 मिनिटांत पार करण्यात आले. वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी औषधोपचाराची गरज आहे. सध्या तिची तब्येत चिंताजनक असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.
रायबरेली येथे ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला होता. या अपघातात जखमी झालेल्यांवर लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू असून बलात्कार पीडित तरुणीची प्रकृती गंभीर होती. उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीचे काका तुरुंगात असून त्यांना भेटण्यासाठी काकी, वकील आणि बलात्कार पीडित तरुणी रायबरेली येथे जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने कारला मागून येऊन जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला.
उन्नाव बलात्कार पीडितेच्या अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयची फॉरेन्सिक टीम शुक्रवारी पुन्हा घटनास्थळी दाखल झाली होती. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 20 अधिकाऱ्यांची विशेष टीम गठीत करण्यात आल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. सीबीआयच्या 20 अधिकाऱ्यांची विशेष टीम गठीत करण्यात आली आहे. यामध्ये एसपी, एएसपी, डीएसपी, निरीक्षक आणि उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी 30 जुलैला झालेल्या अपघात प्रकरण्याची चौकशी करण्यास मदत करणार आहेत, असे सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले होते.
सांताक्रूझ पूर्वेकडील पटेल नगर येथील सहयुवक सहजीवन प्रगती मंडळ येथे रविवा....
अधिक वाचा