ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या - अन्न व औषध प्रशासन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2019 02:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या - अन्न व औषध प्रशासन

शहर : मुंबई

उन्हाळ्यात आंब्यांचा सिझन असल्यामुळे आंब्यापासून बनलेला आमरसावर सर्वच जण ताव मारतात. परंतु बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या. कारण मुलुंडच्या राजा इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये विजय ट्रेडर्स या गोडाउनमध्ये अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून निकृष्ट दर्जाचा आमरस बनवणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

आमरस तयार करणाऱ्या गाळ्यांमध्ये अस्वच्छता दिसून आली. याच जागेवर रासायनिक पदार्थ मिसळून आमरस तयार केला जात होता. अन्न व औषध प्रशासनाने रात्रीच्या वेळी या गोडाउनमध्ये छापा टाकून आमरसात मिसळण्यात येणारा रासायनिक पदार्थ आणि ३४२५ किलोचा आमरससह ८ लाख ८७ हजार असा मुद्देमाल जप्त केला. या आमरसाचे नमुने वैद्यकीय परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे आमरस खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आला आहे.

जर प्रयोगशाळेतील अहवालानंतर गंभिर बाबपुढे आली तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायालयीन कोठडीची तरतूद आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.

मागे

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : सर्व आरोपींना कोर्टाचा दणका
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : सर्व आरोपींना कोर्टाचा दणका

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी सु....

अधिक वाचा

पुढे  

कांदिवलीत वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण;दोघांना अटक
कांदिवलीत वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण;दोघांना अटक

कांदिवली परिसरात वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकर....

Read more