ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुशर्रफ यांना पाच खटल्यात फाशी, मृतदेह 3 दिवस चौकात लटकवणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2019 08:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुशर्रफ यांना पाच खटल्यात फाशी, मृतदेह 3 दिवस चौकात लटकवणार

शहर : विदेश

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ  यांना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर न्यायालयाच्या निर्णयातील बारकावे समोर आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुशर्रफ यांना पाच प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. मुशर्रफ  यांच्यावर देशद्रोहाचा आरोप आहेकोर्टाच्या विस्तृत निर्णयात मुशर्रफ हे पाच खटल्यांमध्ये दोषी आढळले असून, सर्व प्रकरणात त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

फाशीपूर्वी मृत आढळल्यास मृतदेह 3 दिवस चौकात लटकवणार

विशेष न्यायालयाने आपल्या विस्तृत निकालात एका न्यायाधीशांनी म्हटलं आहे की, “जर मुशर्रफ मृत आढळले (न्यायालयाचा निर्णय लागू करण्यापूर्वी) तर त्यांचा मृतदेह पाकिस्तानातील इस्लामाबादच्या डी-चौकात आणून, तो तीन दिवस फासावरच लटकवून ठेवा

मुशर्रफ पाकिस्तानचे पहिलेगद्दार

परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला गेल्या 6 वर्षांपासून सुरु होता. मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. ते पाकिस्तानातील पहिले देशद्रोही ठरले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

परवेझ मुशर्रफ हे राष्ट्रपती असताना त्यांनी पाकिस्तानात 3 नोव्हेंबर 2007 रोजी आणीबाणी लागू केली होती. पाकिस्तानात 2013 मधील निवडणुकांमध्ये विजय मिळवून पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज़) सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर सरकारने सर्वात आधी परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला. याप्रकरणी डिसेंबर 2013 मध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल झाला. इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने परवेझ मुशर्रफ यांना 31 मार्च 2014 रोजी देशद्रोहाच्या खटल्यात आरोपी केलं होतं.

पाकिस्तानाच्या इतिहासात मुशर्रफ हे पहिले नागरिक होते, ज्यांच्याविरोधात संविधानाच्या अवहेलनेचा खटला चालला. मुशर्रफ यांच्याविरोधात 31 मार्च 2014 रोजी आरोप ठेवले गेले होते आणि त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्याविरोधात सर्व पुरावे विशेष न्यायालयासमोर ठेवले होते.या खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुशर्रफ दुबईला गेले ते परत आलेच नाहीत. त्यामुळे कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं.या खटल्यातील सुनावणीदरम्यान परवेझ मुशर्रफ हे केवळ एकदाच विशेष न्यायालयात हजर राहिले. त्यानंतर ते कधीही कोर्टात आले नाहीत. त्याचदरम्यान 2016 मध्ये प्रकृतीचं कारण देत, मुशर्रफ दुबईला गेले. त्यावेळी त्यांना पाकिस्तानात परतण्याच्या अटीवर देश सोडण्याची परवानगी दिली होती.

मागे

लग्नाचं आमिष दाखवून मुलीवर आत्याचार!
लग्नाचं आमिष दाखवून मुलीवर आत्याचार!

       उल्हासनगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवाहित तर....

अधिक वाचा

पुढे  

अश्लिल छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक
अश्लिल छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

             विवाहजुळणी संकेतस्थळावरून तपशील घेत शहरातील ‘आरजे’ (....

Read more