By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
बारामतीमध्ये जन्मदात्या आईने मुलीची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हत्येनंतर आरोपी आई स्वतः पोलिसांकडे हजर झाली आणि हत्येची कबुली दिली. बारामती शहरातील प्रगतीनगर भागात हा प्रकार घडला. ऋतुजा हरीदास बोभाटे(वय19) असे मुलीचे नाव आहे. ऋतुजाने काही दिवसांपूर्वीच प्रेम प्रकरणातून आंतरजातीय विवाह केला होता, पण मुलगा तिला सोबत घेऊन जायला येत नव्हता. त्यामुळे मुलीने नवर्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. आईनेही मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यामुळे मुलगी माहेरीच राहात होती.
यामुळे मुलगी आणि आई यांच्यात नेहमी वाद व्हायचे. कधी-कधी इतर शुल्लक घरगुती कारणांनीही भांडणे व्हायची. हत्येच्या दिवशीशी त्यांच्यात भांडण झाले होते. अखेर संतापलेल्या आईने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घातला आणि तिची हत्या केली. हत्येनंतर आई संजीवनी बोभाटे स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबुली दिली.
अफगाणिस्तानातील काबूलमध्ये कनिष्ठ सभागृह सल्लागार पदी कार्यरत असलेल्या म....
अधिक वाचा