By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 30, 2020 05:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
नवी दिल्ली : दिल्लीत जामियानगर परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू होते. त्याचवेळी एक तरुण या मोर्चात शिरला. "कुणाला स्वतंत्र हवं आहे त्यांनी या मी स्वतंत्र देतो" असे म्हणत त्याने जमावाच्या दिशेने गोळीबार केला. यात जामिया विद्यापीठाचा विद्यार्थी शादाब आलम जखमी झाला आहे. त्याच्यावर होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आंदोलकांवर गोळीबार करणार्याा तरुणाला अटक केली आहे.
आंदोलांकर्त्यांच्या मोर्चा जामियानगर येथून राजघाटपर्यंत जाणार होता. त्यावेळी हा तरुण मोर्चा घुसला त्याने पिस्तूल रोखत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांवर गोळीबार करण्याआधी मोठमोठयाने ओरडून आपली ओळख रामभक्त गोपाळ अशी सांगितली आहे. "मी रामभक्त गोपाळ आहे. या तुम्हाला मी स्वातंत्र्य देतो. "असे सांगत त्याने गोळीबार केला. तो कोण आहे? त्याने गोळीबार का केला? आदी कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेनंतर सीएए विरोधातील मोर्चा जामियानगरमध्येच थांबविण्यात आला. संबंधित युवक बाहेरून येऊन मोर्चात घुसला आणि गोळीबार केला. मात्र पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला नाही, असं आरोप आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर केला आहे.
मुंबई : मुंबईतील आग्रीपाडा बहिणीच्या छेडछाडीला विरोध कर....
अधिक वाचा