ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

परळ हिंदनगर युवकाच्या हत्याने हादरलं, गटारामध्ये सापडला मृतदेह

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

परळ हिंदनगर युवकाच्या हत्याने हादरलं, गटारामध्ये सापडला मृतदेह

शहर : मुंबई

परळी शहरातील हिंदनगर भागात अज्ञात युवकाची हत्या करण्यात आली आहे. सकाळी 5 च्या सुमारास गटारामध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळहळ उडाली आहे. परळीसारख्या भागात अशी हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पहाटेच्या वेळी स्थानिकांना युवकाचा मृतदेह गटारामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. त्यामुळे यातूनच युवकाची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून तो परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पावण्यात आला आहे. पण अद्याप हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तर यात अधिक माहितीसाठी पोलीस प्रत्यक्षदर्शी आणि परिसराती सीसीटीव्हीचादेखील शोध घेणार आहे. बीडमध्ये खुनाचे आणि आत्महत्येचे प्रकार वाढत आहे. प्रेमसंबंधातून आणि रागातून हत्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना रोज बीडमध्ये घडतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आताची तरुणाई या सगळ्यात अडकू नये यासाठी बीड पोलिसांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यात नागरिकांची मदतही तितकीच महत्त्वाची आहे.

मागे

दारु पिऊन आल्याने घरात न घेतल्याच्या रागत जावयाकडून सासूची हत्या
दारु पिऊन आल्याने घरात न घेतल्याच्या रागत जावयाकडून सासूची हत्या

पुण्यातील पाषाणमधील संजय गांधी वसाहतीत आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ....

अधिक वाचा

पुढे  

आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासर्‍याने झाडल्या जावयावर गोळ्या
आंतरजातीय विवाहाच्या रागातून सासर्‍याने झाडल्या जावयावर गोळ्या

पिंपरीमधील गोळीबार प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे. आंतरजातीय विवाहाच....

Read more