ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 28, 2019 12:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षकास मारहाण

शहर : tuljapur

तुळजापुरात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांना बेदम  मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर गाड्या का लावल्या अशी विचारणा पोलीस उपनिरीक्षकाने युवा सेनेच्या कार्यकर्त्याला केली होती. यावर उत्तर म्हणून शिवसेना युवा तालुकाप्रमुख प्रदीप रोचकरी आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या जबर मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांच्या छाती आणि हातावर तीक्ष्ण हत्याऱ्याने वार करण्यात आले आहेत. मारहाण करणाऱ्या प्रदीप रोचकरी आणि अन्य दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. पण ही अटक होताच त्यांच्या समर्थनार्थ पोलीस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला होता. त्यामुळे तुळजापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त मागवला.

पोलीस उपनिरीक्षक गणेश झिंझुरडे यांनी, क्षुल्लक कारणावरून गलिच्छ शिवीगाळ केल्याने काही संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली, झालेला प्रकार चुकीचा असला तरी शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे ? असा सवाल युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी करत याप्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

मागे

गोवंडीत जागेच्या वादातून गोवंडीत गोळीबार
गोवंडीत जागेच्या वादातून गोवंडीत गोळीबार

भरदिवसा आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास जागेच्या वादातून गोवंडी येथे बैंगण वा....

अधिक वाचा

पुढे  

पोलिसांकडून महिलेला अर्ध्या रात्री पट्ट्यानं मारहाण
पोलिसांकडून महिलेला अर्ध्या रात्री पट्ट्यानं मारहाण

हरियाणाच्या फरिदाबादमध्ये पोलिसांचा एक क्रूर चेहरा समोर आलाय. कर्तव्याला....

Read more