ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुलावेसी या द्वीपावर सापडले चक्क 44 हजार वर्षे जुने चित्र

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 08:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुलावेसी या द्वीपावर सापडले चक्क 44 हजार वर्षे जुने चित्र

शहर : विदेश

           इंडोनेशिया - सुलावेसी या द्वीपावर एका गुहेत हजारो वर्ष जुने भित्तिचित्र सापडले आहे. हे जगातील सर्वात जुने भित्तिचित्र असल्याचे सांगितले जात आहे. 4.5 मीटर रुंद या दुर्मिळ भित्तिचित्राला गुहेच्या भिंत्तीवर बनवण्यात आले आहे. या चित्रात एक शिंग असणारा प्राणी आहे व शिकारी त्याचा पाठलाग करत आहे.


           या भित्तिचित्रा संबंधित एक संशोधन नेचर पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. संशोधकांनुसार, यूरोपच्या गुहेत देखील अनेक कोळशापासून बनवलेले भित्तिचित्र सापडले आहे. मात्र या चित्राएवढे ते जुने नसून यूरोपच्या गुफेत सापडलेली चित्र 14 ते 21 हजार वर्ष जुनी असल्याची सांगितली जातात. आतापर्यंत याच चित्रांना जगातील सर्वात जुनी कलाकृती असल्याचे सांगितले जात असे.


              ऑस्ट्रेलियातील ग्रफिथ युनिवर्सिटीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांच्या टीमचे म्हणणे आहे की, त्यांनी एवढे आश्चर्यकारक भित्तिचित्र पहिल्यांदा बघितले आहे. या संशोधनाचे लेखक मॅक्समी ऑबर्ट यांच्यानुसार, गुफेत सापडलेले भित्तिचित्र कमीत कमी 43,900 वर्ष जुने आहे. इंडोनेशियाच्याच बोर्निया द्वीपावर असेच एक भित्तिचित्र सापडले होते, त्याला देखील 40 हजार वर्ष जुने असल्याचे सांगितले जात होते.
 

मागे

8 डिसेंबरला साजरी केली जाईल मोक्षदायिनी एकादशी, या व्रतामुळे….
8 डिसेंबरला साजरी केली जाईल मोक्षदायिनी एकादशी, या व्रतामुळे….

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला भारतीय धर्म शास्त्रामध्य....

अधिक वाचा

पुढे  

दहिसर ‘कोकण महोत्सव’ जल्लोषात...
दहिसर ‘कोकण महोत्सव’ जल्लोषात...

               मुंबई - सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, बौद्धिक क्षेत्रा....

Read more