By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2020 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दिवाळीच्या खास दिवसांमध्ये एक विशेष दिवस म्हणजे धनतेरस. या दिवशी भगवान धन्वंतरी, यमराज, कुबेर, लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. चला जाणून घेऊ या की या दिवशी संपूर्ण धणे का खरेदी करतात.
असं म्हणतात की धनतेरसच्या दिवशी पिवळ्या वस्तू विकत घ्यावा. जसे सोनं, पितळ्याची भांडी किंवा धणे. असं म्हणतात की जे लोक धनतेरसच्या दिवशी सोनं खरेदी करू शकत नाही त्यांनी पितळ्याची भांडी खरेदी करावी. हे दोन्ही वस्तू खरेदी करू शकत नसल्यास धणे खरेदी करावे. पण असं फार कमी लोक मानतात. धणे खरेदी करण्याचे आणखी कारणे आहेत.
विशेष कारण : विशेषतः संपूर्ण धणे खरेदी करणे शुभ असत. या दिवशी जिथे ग्रामीण भागात धण्याचे बियाणे खरेदी करतात, तर शहरी भागात पूजे साठी संपूर्ण धणे खरेदी करतात. या दिवशी धण्याची पूड करून गुळात मिसळून एक मिश्रण बनवून नैवेद्य तयार करतात. असं मानतात की असं केल्याने पैशाचे नुकसान कधी होत नाही. धणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून धनतेरसला धणे आवर्जून विकत घ्या.
आख्यायिकेनुसार धनतेरसच्या दिवशी आई लक्ष्मीला धणे अर्पण केल्यावर आणि भगवान धन्वंतरीच्या चरणी धणे अर्पण केल्यानंतर प्रार्थना केल्यास त्याचे फळं मिळतं आणि माणसाची प्रगती होते. पूजा केल्यानंतर धण्याचा प्रसाद सर्वाना वाटप केला जातो.
इतर वस्तू : धनतेरसला झाडू, पिवळ्या कवड्या किंवा हळकुंड देखील विकत घ्यावे. धनतेरसला कवड्या विकत घ्या आणि ते पिवळ्या नसतील तर त्यांना हळदीच्या घोळात टाकून पिवळं करा. नंतर यांची पूजा करून त्यांना तिजोरी मध्ये ठेवून द्या. या शिवाय धनतेरसच्या दिवशी शुभ मुहूर्त बघून बाजारपेठेतून पिवळे हळकुंड किंवा काळी हळद घरात आणा. या हळद ला नव्या कोऱ्या कापडावर ठेवून याची षोडशोपचार पूजा करून स्थापित करावी. हे संपत्ती आणि समृद्धी वाढवणारे उपाय मानले जाते.
अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयो....
अधिक वाचा