By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. 'कालविवेक' या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व सांगितले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते. यावर्षी अक्षय तृतीया ७ मे रोजी साजरी केली जाणार आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. असे मानले जाते की, या दिवशी दान देणाऱ्या व्यक्तीने दान दिल्या जाणाऱ्या वस्तूची विशेष काळजी घ्यावी लागेल. असं न केल्यास तुम्हाला त्याचा लाभ मिळत नाही. या दिवसाबाबत अशी मान्यता आहे की, या दिवशी गरजू व्यक्तीला दान दिल्याने आणि अन्न दिल्याने समृद्धी लाभते. तर या दिवशी काही गोष्टी टाळाव्या असेही मानले जाते. त्या काय आहेत बघुयात...
राग करू नका -
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कुणाबाबतही मनात रागाची भावना ठेवू नका. जर या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करून कुणाबाबत मनात रोग ठेवत असेल तर लक्ष्मी त्या व्यक्तीकडे कधीच थांबत नाही, असे मानले जाते.
रिकाम्या हाताने घरी जाऊ नका -
असे मानले जाते की, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लाभ होण्यासाठी सोन्याची एखादी वस्तू खरेदी करावी. या दिवशी घरी रिकाम्या हाताने जाणे अशुभ मानलं जातं. जर सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर क्षमतेनुसार, धातूपासून तयार एखादी वस्तू खरेदी करावी.
पूजेत तुळशीचा वापर -
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी पूजनासोबतच भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्त्व असतं. भगवान विष्णूची पूजेवेळी तुळशीचा वापर केला जातो.
विष्णू-लक्ष्मीची एकत्र पूजा
समृद्धीसाठी भाविकांना अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा वेगवेगळी करू नये. दोघांचीही पूजा एकत्र करावी. याने समृद्धी येते.
पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त
७ मे २०१९ रोजी, मंगळवारी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार.
पूजेचा मुहूर्त - सकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून १७ मिनिटांपर्यंत.
सोने खरेदीचा शुभ मुहूर्त - सकाळी ६ वाजून २६ मिनिटांपासून ते रात्री ११ वाजून ४७ मिनिटांपर्यंत.
प्रचंड उष्म्यामुळे होत असलेले उत्सर्जन असेच कायम राहिले तर जगातील 46 वारस्य....
अधिक वाचा